कृषी विद्यापीठातील रोजंदारी कामगारांना न्याय देणार
दापोली येथील बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठातील रोजंदारी कंत्राटी कामगारांच्या पाठीशी भ्रष्टाचार निर्मूलन समिती खंबीरपणे उभी राहणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष रवींद्र त्रिवेदी यांनी दिली.कृषी विद्यापीठात काम करणाऱ्या रोजंदारी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत दापोली येथे शिंदे सभागृहात बैठक झाली.याबाबत या कामगारांचा प्रश्न सुटला नाही तर सप्टेंबरमध्ये निर्मूलन समितीचे एक लाख सभासद दिल्ली येथे उपोषणाला बसतील असा इशारा त्यानी दिला.कृषी विद्यापीठातील अडीचशे कंत्राटी कामगारांना कमी केल्याचे या कामगारांचे म्हणणे आहे.तर दापोली कृषी विद्यापीठाच्या प्रशासनाने कामगार कमी केले नसल्याचे सांगितले आहे. हे कंत्राटी कामगार ठेकेदारामार्फत विद्यापीठात काम करतात यातील काही ठेकेदारांनी मुदत संपल्यावर नवीन नियमानुसार ठेका भरला नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
www.konkantoday.com