एसटीने सामान घेऊन जाणे प्रवाशांना” जड” होणार
कोकणातील चाकरमान्यांच्या एसटीचा प्रवास म्हणजे आवडीचा प्रवास.कोकणात रेल्वे सुरू झाली तरी एसटीच्या लाल डब्याची पसंती कमी झालेली नाही.
चाकरमानी गावाहून मुंबईला किंवा अन्य ठिकाणी परतताना मोठ्या प्रमाणावर सामान घेऊन जात असतात मे महिन्याच्या हंगामात तर आंब्याचे करंडे व फणस ,हिराची झाडू घेऊन जाणारे चाकरमानी आपल्याला दिसतात. आता या चाकरमान्यांना एसटीतून असे सामान नेणे जड जाणार आहे.कारण राज्य परिवहन मंडळाने वीस किलोपेक्षा अधिक वजनाचे सामान असल्यास पाचपट भाडे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. २७ऑगस्टपासून सामानाच्या तिकीटाचे किमान भाडे पाच रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत कि.मी नुसार आकारण्यात येणार आहे. यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक फटका बसणार आहे.
www.konkantoday.com