
रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वरसह सावर्डे, डेरवणला वादळी पावसाचा पुन्हा तडाखा
चिपळूण शहरासह तालुक्यात गेल्या आठवडाभराहून अधिक काळ वादळी पावसाचा कहर सुरूच असून बुधवारी एकदा दुपारच्या वेळेत सावर्डे, डेरवण परिसराला वादळी पावसाने झोडपून काढले. डेरवण-काजरकोंड भागात वादळी पावसात इमारतीवरील पत्राशेड उडून घरादारांवर, दुकानांवर वृक्ष कोसळले. असंख्य वाहने कोसळलेल्या वृक्षांखाली दबली गेली. वीजखांब कोसळल्याने तसेच ठिकठिकाणी वीजतारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. गेले आठवडाभर सुरू असलेल्या वादळी पावसात सावर्डे, डेरवण परिसराला अधिक तडाखा बसला. दरम्यान संगमेश्वर तालुक्यातील शिवधामापूर, मावळंगे आणि मौजे करजुवे गावांना मंगळवारी रात्रीच्या दरम्यान आलेल्या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. वादळी पावसाने २६ घरांचे नुकसान केले असून १५ विजेचे पोल कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला. www.konkantoday.com