जिल्हाधिकारी यांचा मनाई आदेश भंग करून रॅली काढल्याबद्दल मुन्ना देसाई, महेश म्हाप व अन्य ४० जणांविरूद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी: जिल्हाधिकारी यांचा मनाई आदेश असतानाही बेकायदेशीर जमाव जमवून सार्वजनिक शांततेचा भंग केला व रहदारीस अडथळा करून रॅली काढली म्हणून मुन्ना देसाई, महेश म्हाप, सागर म्हापुसकर व अन्य ३० ते ४० जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नुकत्याच एका खटल्यामधून मुन्ना देसाई व इतर ११ जणांची न्यायालयाने निर्दोष सुटका केल्यानंतर रत्नागिरी जेलमध्ये असलेले मुन्ना देसाई यांची सुटका झाली. त्यावेळी गेटच्या बाहेर गर्दी जमली होती. त्यानंतर हे सर्वजण मोटरसायकल व गाड्या घेवून हातखंब्याच्या दिशेने रवाना झाले. ते साळवी स्टॉपच्या दिशेने जात असता गाड्यांचे हेडलाईट, इंडिकेटर लावून गाड्यांचे हॉर्न देत चारचाकी वाहनांत धोकादायक स्थितीत बसून वाहने धोकादायक स्थितीत चालवून, मोठ्याने ओरडुन, किंचाळून, घोषणा देत दहशत निर्माण होईल असे वातावरण निर्माण करून रहदारीस अडथळा होईल अशी रॅली काढली असे फिर्यादीनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबतची व्हिडिओ क्लीप पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी वरील सर्वांविरूद्ध सार्वजनिक शांततेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
__________________________
कोकणातील ताज्या बातम्या व्हॉट्सअॅपवर वाचण्यासाठी कोकणटुडे व्हॉट्सअॅप ग्रुपवर सामील व्हा
_________________________
https://chat.whatsapp.com/K0I8GnYg9qHKtqaNeS63Oz