संगमेश्‍वर तालुक्यातील ग्रामीण रूग्णालय आणि ड्रामा केअर सेंटरमध्ये गेली वर्षे अधिकार्‍यांची पदे रिक्त.

संगमेश्‍वर तालुक्यातील ग्रामीण रूग्णालय आणि ड्रामा केअर सेंटरमध्ये गेली अनेक वर्षे महत्वाची वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपचार करण्यात अडथळे येत असून त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी आरोग्य यंत्रणा मजबूत असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीन लोकप्रतिनिधींनी पावले उचलली पाहिजेत, तरच त्याचा उपयोग सर्वसामान्यांना होवू शकते.

मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्‍वर-कसबा नजिक ग्रामीण रूग्णालय आणि त्याच इमारतीसमोर ट्रामा केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. संगमेश्‍वर परिसरातील सुमारे १५ गावातील गावातील सर्वसामान्य ग्रामस्थांना या संगमेश्‍वर ग्रामीण रूग्णालयाचा महत्वाचा आधार आहे. तर आरवली ते बावनदी या ४० किलोमीटर्सच्या अपघातप्रवण क्षेत्रात अपघातग्रस्तांवर तातडीचे उपचार व्हावेत, याकरिता या अत्याधुनिक ट्रामा केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र गेली अनेक वर्षे या ट्रामा केअर सेंटरमधील महत्वाची पदे रिक्त आहेत.

संगमेश्‍वर ग्रामीण रूग्णालयासह महत्वाच्या ट्रामा केअर सेटरमध्ये अत्यावश्यक असलेली डॉक्टरांचीच पदे रिक्त असल्याने अन्य कर्मचार्‍यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी या महत्वाच्या पदांसह तब्बल १२ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांअभावी रूग्णसेवाच आजारी पडली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button