
कंपाऊंडमधील लेलँड टेम्पो चोरून नेला
रत्नागिरी: रत्नागिरी एमआयडीसीमध्ये उभा करून ठेवलेला लेलँड कंपनीचा टेम्पो अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. यातील फिर्यादी जितेंद्र विजय कदम (रा. मजगांव) याने आपला टेम्पो एमआयडीसी येथे प्लॉट नं.सी ७०, हा शेख यांच्या कंपाऊंडमध्ये उभा करून ठेवला होता. अज्ञात चोरट्याने हा टेम्पो पळवून नेला. त्यामुळे फिर्यादी यांचे पाच लाखांचे नुकसान झाले असल्याची फिर्याद त्यांनी पोलीस स्थानकात दिली आहे.