
मैथिली खून प्रकरणातील आरोपी लवकरच पोलिसांच्या जाळ्यात ?
खेडशी येथील महाविद्यालयीन विद्यार्थी मैथिली गवाणकर हिच्या खून प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना मिळत असून लवकरच पोलीस आरोपींच्या मुसक्या आवळतील अशी शक्यता आहे.काही दिवसांपूर्वी शेळया चरण्यासाठी गेलेल्या मैथिली गवाणकर हिचा दगडाने ठेचून भीषण खून झाला होता.या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी तपास करताना विविध शक्यता तपासून पाहिल्या होत्या.या खून प्रकरणात काही जवळच्या लोकांचा समावेश असावा असा संशय पोलिसांना आहे.यादृष्टीने त्यांनी आता तपास सुरू ठेवला आहे.लवकरच या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com