तिजोरी फोडून संशयित महिलेने सोन्याचे दागिने लांबविले

चिपळूण:तालुक्यातील दादर गुरववाडी येथे फिर्यादी ज्योत्स्ना जगन्नाथ सकपाळ या घराबाहेर गेल्या असता दरवाजाजवळ असलेली चावी घेवून घरातील तिजोरीतून ३९५०० रुपयांचे दागिने संशयित महिलेने पळवून नेल्याची तक्रार चिपळूण स्थानकात करण्यात आली आहे. या संशयित महिलेचे नाव राजश्री चव्हाण असे आहे. यातील फिर्यादी ज्योत्स्ना सकपाळ यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या राहत्या घरात टोपीखालील खिळ्याला अडकवून ठेवलेल्या चावीचा वापर करून सदर संशयित महिलेने घरात प्रवेश केला आणि लाकडी कपाटातून तिजोरीच्या चाव्या घेवून कपाटातील ४० हजार रुपयांचे दागिने लांबविले. हा प्रकार २० दिवसांपूर्वी घडला होता. मात्र गावाची मिटींग घेवून हा प्रश्‍न सोडविण्यात येणार होता, तो न सुटल्याने सदर महिलेने आता तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button