
टेम्पो झाडावर आदळल्याने महिला जखमी
साखरप्या नजीक गांधी हायस्कूल जवळ रत्नागिरीहून कोल्हापूरला जाणारा एक टेम्पो झाडावर आदळल्याने एक महिला जखमी झाली आहे. हा टेम्पो कोल्हापूरच्या दिशेने जात असता वाहन चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि तो बाजूच्या झाडावर आदळला.या अपघातात सकूबाई कोळापटे ही महिला जखमी झाली असून तिच्या डोक्याला मार बसला आहे.गाडीचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. सदर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
www.konkantoday.com