
खड्डेमुक्त रस्ता मोहिमेमुळे वाहानचालकांसमोर नवी समस्या
रत्नागिरी शहरातील अनेक भागातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे.आता रत्नागिरी नगर परिषदेने हे खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे. हे खड्डे बुजवताना घालण्यात आलेली खडी रस्त्यावर पसरून व बाजूला गेल्याने वाहनचालकांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे या ठिकाणी किरकोळ अपघात होत आहेत. दुचाकी या खडीवरून घसरण्याची शक्यता निर्माण झाल्याने आता वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे अडचणीचे होत आहे. मुळात खड्डय़ात भरलेली खडी अशी पसरली कशी गेली असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.निदान ही पसरलेली खडी नगरपरिषदेने गोळा करणे आवश्यक आहे अन्यथा या रस्त्यावरून वाहतूक करणे धोक्याचे बनत आहे. सध्या पावसाने पाचव्या दिवशीही विश्रांती घेतली असली तरी नगर परिषदेने वेगवेगळी पथके करून एकाच वेळी हे खड्डे भरण्याचे काम करणे आवश्यक होते ते होत नसल्याचे दिसत आहे.
__________________________
कोकणातील ताज्या बातम्या व्हॉट्सअॅपवर वाचण्यासाठी कोकणटुडे व्हॉट्सअॅप ग्रुपवर सामील व्हा
_________________________
https://chat.whatsapp.com/K0I8GnYg9qHKtqaNeS63Oz