कोकण रेल्वेमार्गावर गणपती विशेष गाड्या,गाड्यांच्या डब्यांमध्येही वाढ
गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना खुशखबर.कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी अजुन दोन विशेष गाडया सोडण्यात येणार आहेत.या गाड्या पुणे, लोकमान्य टिळक(T), पनवेल आणि सावंतवाडी रोड दरम्यान गणेशोत्सव कालावधीत होणारी गर्दी कमी करण्यासाठी या गाडया सोडण्यात आल्या आहेत.त्याचप्रमाणे काही गाड्यांच्या डब्यांमध्ये देखील मध्य रेल्वेकडून वाढ करण्यात आली आहे.
ट्रेन नंबर 01221/01222 पुणे जं-सावंतवाडी रोड-लोकमान्य टिळक स्पेशल.
01221 ही गाडी पुणे जं वरुन 12.10 hrs 29 ऑगस्ट 2019 गुरुवारी सुटेल,गाडी दुसऱ्या दिवशी 04.00hrs वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.ही गाडी लोणावळा, कल्याण ,पनवेल, रोहा, माणगाव,वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड,रत्नागिरी,आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग,कुडाळ,झाराप या स्थानकांवर थांबेल.
01222 सावंतवाडी रोड- लोकमान्य(T) विशेष ही गाडी सावंतवाडी रोडवरून 5.20hrs 30 ऑगस्ट २०१९ ला सुटेल आणि लोकमान्य टिळक (T)ला 16.50hrs त्याच दिवशी पोहोचेल.ही गाडी झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड,राजापूर रोड,विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, वीर, माणगाव,रोहा,पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबेल.
गाडी नंबर 01223/01224 लोकमान्य टिळक(T) – सावंतवाडी रोड-पनवेल विशेष
01223 लोकमान्य टिळक(T)- सावंतवाडी रोड ही गाडी लोकमान्य टिळक(T) वरुन 17.50hrs 30 ऑगस्ट 2019 शुक्रवारी सुटेल व ती सावंतवाडी रोडला 6.30hrs ला दुसऱ्या दिवशी पोहोचेल.ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड,रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड,कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबेल.
01224 सावंतवाडी रोड पनवेल विशेष ही गाडी सावंतवाडी रोडवरून 10.55hrs 31 ऑगस्ट 2019 शनिवारी सुटेल व पनवेल येथे 23.40 hrs ला त्याच दिवशी पोहोचेल.ही गाडी झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली,वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड,वीर माणगाव आणि रोहा या स्थानकांवर थांबेल.
ट्रेन नं 01225/01226 पनवेल- सावंतवाडी रोड -पुणे जंक्शन स्पेशल
01225 पनवेल- सावंतवाडी रोड ही विशेष गाडी पनवेल येथून 00.55hrs 1 सप्टेंबर 2019 रविवारी सुटेल तसेच ती सावंतवाडी रोडला 14.10hrs ला त्याच दिवशी पोचेल.ही गाडी रोहा, माणगाव, वीर ,खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड,रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप येथे थांबेल.
01226 सावंतवाडी रोड पुणे जंक्शन विशेष गाडी सावंतवाडी येथून 15.20hrs 1 सप्टेंबर 2019 रविवारी सुटेल व पुणे जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी 7.25hrs ला पोहोचेल.
मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे गणेशोत्सवादरम्यानची गर्दी लक्षात घेऊन खालील गाड्यांचे डबे पुढे दर्शवल्याप्रमाणे वाढवण्यात आले आहेत
01001/02 छ.शि.ट – सावंतवाडी – छ.शि.ट (आठवड्यातून 5 दिवस ) – 20 चे 22 डबे
01007/08 छ.शि.ट – सावंतवाडी – छ.शि.ट (आठवड्यातून 2 दिवस ) – 20 चे 22 डबे
01033/34 छ.शि.ट – रत्नागिरी – पनवेल (दररोज ) – 20 चे 22 डबे
01035/36 पनवेल – सावंतवाडी – छ.शि.ट (दररोज ) – 20 चे 22 डबे
01431/32 पुणे – रत्नागिरी – पुणे (साप्ताहिक ) – 20 चे 22 डबे
01447/48 पुणे – करमळी – पुणे (साप्ताहिक ) – 20 चे 22 डबे
01433/45 पनवेल – सावंतवाडी – पनवेल (साप्ताहिक) – 20 चे 22 डबे
01047/48 पनवेल – सावंतवाडी – कुर्ला ट. (साप्ताहिक) – 20 चे 22 डबे