एसटी प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी दुरुस्ती पथक व्हॅन
अनेक वेळेला एसटीच्या बिघाडामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागते.प्रवास करताना एसटी बसमध्ये काही बिघाड झाल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करता यावी यासाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळाने प्रत्येक आगारासाठी दुरुस्ती पथक व्हॅन देण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी व चिपळूण आगारात दोन ठिकाणी दुरुस्ती पथक व्हॅन आल्या आहेत.अनेक वेळा रस्त्यात एसटी गाडया बंद पडल्याच्या दिसतात पूर्वी अशा गाडया बंद पडल्या की जवळच्या आगारातून दुरुस्तीसाठी मेकॅनिक पाठवले जात होते. त्यात मोठा बिघाड असेल तर त्या एसटीला कार्यशाळेत पाठवावे लागत होते. यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा होत होता. आता नव्याने देण्यात आलेल्या दुरूस्ती पथकाच्या व्हॅनमध्ये दुरुस्तीसाठी लागणारी सर्व यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामुळे एखादी एसटी बस बंद पडली असेल तर त्या ठिकाणी ही व्हॅन जाऊन त्याची तातडीने दुरुस्ती करणार आहे.यामुळे प्रवाशांची यापुढे गैरसोय टळणार आहे. एसटी महामंडळाने राज्यात अशा पन्नास दुरुस्तीपथक व्हॅन खरेदी केले आहेत.
__________________________
कोकणातील ताज्या बातम्या व्हॉट्सअॅपवर वाचण्यासाठी कोकणटुडे व्हॉट्सअॅप ग्रुपवर सामील व्हा
_________________________
https://chat.whatsapp.com/K0I8GnYg9qHKtqaNeS63Oz