शाळकरी मुलाच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचा नातेवाईकांचा आरोप
दापोली तालुक्यातील टेटवली येथील पंकज कदम या विद्यार्थाला सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केल्याने खळबळ उडाली आहे. तसेच जोपर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.नातेवाईकांनी काही काळ मृतदेह दापोली-हर्णे मुख्य राज्य मार्गावर ठेवल्याने खळबळ उडाली होती.अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून लोकांना मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्याची विनंती केली. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले.
__________________________