बंद पडलेला भारतीय शिपयार्ड प्रकल्प पुन्हा सुरू करावा
रत्नागिरी: रत्नागिरी मिर्या बंदर येथे जहाज बांधणीचा भारतीय शीपयार्ड यांचा प्रकल्प परत सुरू करावा यासाठी आपण प्र्रयत्न करावेत अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांना एक पत्र दिले असून मिर्याबंदर येथील भारतीय शिपयार्ड कंपनी २०१२ मध्ये जागतिक मंदीमुळे बंद पडली होती. या कंपनीत जवळजवळ स्थानिक २ हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला होता.परंतु कंपनी बंद पडल्यामुळे त्या लोकांचा रोजगार मुकला आहे. सध्या कंपनी नॅशनल लॉ ट्रीब्युनलच्या कोर्टाच्या अधिकारात असून त्याबाबत अद्याप निर्णय लागलेला नाही. मात्र कंपनीचे संबंधित व्यवस्थापनाशी चर्चा झाल्यास यातून मार्ग निघून कंपनी पुर्ववत चालू शकते. यासाठी आपण लक्ष घालावे अशी त्यांनी मागणी केली आहे.
www.konkantoday.com