चिपळूण शहरात सुरक्षिततेच्यादृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत पोलिसांच्या नगरपरिषदेला सुचना
चिपळूण : चिपळूण शहराचे शहरीकरण वाढत असून यामुळे शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणातही काही प्रमाणात वाढ झाली आहे. शहरात घरफोडी, चोरी अशा अनेक घटना घडल्या आहेत. यासाठी चिपळूण शहरातील विविध चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना चिपळूण पोलिसांनी चिपळूण नगरपालिकेला केली आहे. सध्या घडणार्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाच्या २६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे गरजेचे आहे. आता याबाबत नगरपरिषद कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे.
www.konkantoday.com