शेत नांगरणी स्पर्धेबाबत कायदेशीर लढाई लढणार:आ. भास्कर जाधव
गुहागर: गुहागर येथे झालेली शेत नांगरणी स्पर्धा ही कायद्याचे उल्लंघन न करता कायद्याच्या चौकटीत राहून झाली आहे. अशा स्पर्धांमुळे शेती करणार्या तरूण वर्गाला प्रोत्साहन मिळावे हा हेतू असतो. परंतु या स्पर्धेचे आयोजन करणार्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र आपण रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांच्या पाठिशी उभा राहणार असून सगळी ताकद पणाला लावून कायदेशीर लढाई लढणार असल्याचे भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले.आ. भास्कर जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र गुहागर पोलिसांनी आयोजक व स्पर्धेत भाग घेतलेल्यांवर गुन्हे दाखल केले होते. ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडून तालुक्यातील तरूणांनी प्रचंड उत्साह दाखवला होता. परंतु गुहागर तालुक्यातील भाजपच्या एका नेत्याचा पोटशूळ उठल्याने त्याने पोलीस स्थानकात तक्रार करून गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले असाही आरोप जाधव यांनी केला.
www.konkantoday.com