
रत्नागिरी जिल्ह्यात दोन आगारात एस.टी. बसेसमध्ये व्हीटीएस यंत्रणा सुरू होणार
रत्नागिरी :एस.टी. महामंडळाने प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या व्हीटीएस यंत्रणेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी व चिपळूण या ठिकाणच्या १२५ एस.टी. बसेसमध्ये व्हीटीएस यंत्रणा बसविण्यात येत असून ही यंत्रणा येत्या काही दिवसात सुरू होईल. या यंत्रणेमुळे एस.टी.च्या वाहतुकीवर नियंत्रण करणे सोपे जाणार आहे. एस.टी. उशीरा येण्याची कारणे तसेच प्रवाशांना नेमकी बस कधी येणार आहे हे कळू शकणार आहे. याशिवाय एखाद्या अधिकृत ठिकाणी चालकाने बस थांबविली नाही तर त्याचीही माहिती या यंत्रणेद्वारे मिळू शकणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक चांगली सेवा एस.टी. महामंडळाकडून मिळू शकणार आहे.
www.konkantoday.com