म्हाडाच्या कारकिर्दीत प्रथमच म्हाडा भवनाच्या बाहेर रत्नागिरीत २६ ऑगस्टला बैठक, ५० वरिष्ठ अधिकार्यांची उपस्थिती
रत्नागिरी: म्हाडा प्राधिकरणाची म्हाडा भवनाच्या बाहेर प्रथमच रत्नागिरीमध्ये बैठक घेण्याचा निर्णय म्हाडाचे अध्यक्ष आ. उदयजी सामंत यांनी घेतला आहे. ही बैठक २६ ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार असून या बैठकीला म्हाडाचे ५० वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कोकणातील प्रस्तावित प्रकल्पांना मंजुरी देण्याबरोबरच अनेक महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.
म्हाडामार्फत राज्यातील विविध भागात मोठमोठे प्रकल्प राबविले जात आहेत. म्हाडा अध्यक्षपदाचा मान कोकणाला प्रथमच मिळाला आहे. म्हाडाच्या माध्यमातून कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी, चिपळूणसह इतर जिल्ह्यातील मुख्य ठिकाणी प्रकल्प उभारण्याचे प्रस्ताव म्हाडाकडे आले आहेत. या प्रस्तावांबाबत बैठकीत निर्णय होणार आहे. या बैठकीला वरिष्ठ अधिकारी संजय गुप्ता, नितीन करीन, उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, मुंबई म्हाडा अध्यक्ष मधू चव्हाण यांच्यासह म्हाडाच्या विविध कमिटींचे अध्यक्ष, सचिव राधाकृष्ण बी. डी., जी. श्री. वर्मा यांच्यासह ५० अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
__________________________
कोकणातील ताज्या बातम्या व्हॉट्सअॅपवर वाचण्यासाठी कोकणटुडे व्हॉट्सअॅप ग्रुपवर सामील व्हा
_________________________
https://chat.whatsapp.com/K0I8GnYg9qHKtqaNeS63Oz