कुणाचे तरी हित जपण्यासाठी चिपळूण कराड रेल्वे मार्ग प्रलंबित -शौकत भाई मुकादम
चिपळूण कराड हा रेल्वेमार्ग कोकणातील जनतेसाठी आणि कोकण रेल्वेसाठी देखील फायद्याचा मार्ग ठरणार आहे. तसेच कमी पैशात हा प्रकल्प मार्गी लागू शकतो आणि कोकणला पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडता येणे शक्य आहे.मात्र कोणाच्या तरी हितासाठी हा मार्ग प्रलंबित ठेवण्यात येत असल्याचा आरोप कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केला आहे.पाच वर्षांपूर्वी चिपळूण कराड या रेल्वेमार्गाची आखणी करण्यात आली कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्यानंतर त्यांनी या मार्गाला हिरवा कंदील दाखविला शंभर कोटींचा आराखडा यासाठी तयार करण्यात आला होता. परंतु हा प्रकल्प शासनाने बासणात गुंडाळून ठेवला.हा मार्ग फायद्याच्या असताना देखील शासनत्याकडे दुर्लक्ष करून कोकणवासीयांची चेष्टा करत असल्याचा आरोपही मुकादम यांनी केला.
www.konkantoday.com