सायफिस्ट कंपनीवर कारवाई करण्याचे उपोषणकर्त्यांना आश्वासन
गाणे खडपोली वसाहतीमध्ये असणार्या सायफिस्ट कंपनीकडून नदी नाल्यात प्रदूषित पाणी सोडले जात आहे.यामुळे या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो तसेच हे पाणी नदीत सोडल्यामुळे नदीतील मासेही मरत आहेत.यासाठी चिपळूणमधील प्रदूषण महामंडळाच्या कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे नासिर भाई खोत यांच्यासह शंभर बाधित ग्रामस्थ तीन दिवस उपोषणाला बसले होते. शेवटी या कंपनीवर कारवाई करण्यात येइल असे आश्वासन प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना दिले आहे.
www.konkantoday.com