
रत्नागिरी तालुक्यातील उक्षी चिंचवाडी येथे सापडलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील उक्षी चिंचवाडी येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या तरूणाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली. विनोद सखाराम रावणांग (४४, रा. उक्षी चिंचवाडी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली.पोलिसांच्या माहितीनुसार विनोद रावणंग हे १३ मार्च रोजी सकाळी ९ च्या सुमारास घराचे बाहेर नारळाच्या झाडाच्या बाजूला बेशुद्धावस्थेत आढळले. यावेळी त्यांच्याजवळ आंबा फवारणीचे विषारी द्रव्य होते. विनोद यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना उपचारासाठी जाकादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकार्यांनी विनोद यांना तपासून मृत घोशित केले, अशी नोंद पोलिसांत करण्यात आली.www.konkantoday.com