
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.यावेळी लोकांशी आपुलकीने संवाद साधत त्यांनी लोकांची विचारपूस केली.शिवसेना आपल्या सदैव पाठीशी असल्याचे सांगितले बांदा येथे विठ्ठल मंदिरात पुरग्रस्तांशी संवाद साधताना लोकांमध्ये बसून त्यांनी पुरस्थितीमुळे बाधित झालेल्यांचा आढावा घेतला.यावेळी आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्तांना भांडी, डाळ, तांदूळ, चटई, चादर, साखर आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.तसेच पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना धनादेशाचे वितरण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक ,सिंधुदुर्ग जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर सचिन अहिर, जिल्हाप्रमुख संजय पडते, आदींसह शिवसेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
www.konkantoday.com