महावितरणच्या कंत्राटदाराच्या गाडीला अपघात, दोनजण जखमी
गुहागर: गुहागर चिखलीहून शृंगारतळीकडे निघालेल्या युटीलिटी व्हॅन झाडावर आदळल्याने दोनजण जखमी झाले आहेत. यामध्ये गाडीचा चालक किरण साळुंके, दिपक वेदंड यांचा समावेश आहे. महावितरण कंपनीचे काम घेतलेल्या खाजगी कंत्राटदाची ही गाडी होती. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी शृंगारतळी येथे एका वडाच्या झाडावर आदळून अपघात झाला. अपघातातील जखमींना खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
www.konkantoday.com