चिपळूण पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन


सध्या देशामध्ये कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे.याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सीमा बंद करण्यात आल्या आहेत व सर्वत्र लॉकडाउन आहे.लॉकडाउन न पाळणाऱ्यांना पोलिस त्यांचा खाकी हिसका दाखवत आहे.परंतू चिपळुणात एका आजींना पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन घडून आले.इंदू गणपत मोहिते, बौद्धवाडी, चिपळूण, रत्नागिरी या आजी घरी एकट्याच राहत असल्याची व त्यांच्या घरचे राशन संपले असल्याची कल्पना मीनल मोहिते यांनी चिपळूण पोलिसांना दिली.तसेच त्यांचा मुलगा मुंबई येथे कामाला असून त्या घरी एकट्याच राहतात असे देखील त्यांनी सांगितले.ही माहिती चिपळुन पोलिसांना कळताच क्षणाचाही विलंब न करता पोलीस आजींच्या घरी पोहोचले व त्यांना 1 महिना पुरेल इतके राशन,सॅनिटायझर व मास्क देण्यात आले. तसेच अत्यावश्यक गरज पडल्यास जवळच्या पोलीस अंमलदार यांचा मोबाईल क्रमांकही त्यांना देण्यात आला.चिपळूण पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे व मदत कार्यांमुळे नागरिकांनी समाधान व पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button