पुरग्रस्तांचे पंचनामे नाहीत: आ. प्रसाद लाड
राजापूर: राजापूर तालुक्यात शहरात भरलेल्या महापुराच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल खात्याचे अधिकारी नसल्यामुळे आ. प्रसाद लाड यांनी नाराजी व्यक्त केली. राजापुर दौर्यावर असलेल्या प्रसाद लाड यांनी पुरग्रस्त नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. त्यावेळी या लोकांना शासकीय मदत मिळाली नसल्याचे आढळून आले. पुरपरिस्थितीला १५ दिवस उलटूनही अधिकारी पंचनामे करण्यासाठी फिरकले नसल्याबद्दल तक्रारी आहेत. याची दखल लाड यांनी घेवून संबंधित अधिकार्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
www.konkantoday.com