कुणबी समाज स्वतंत्र उमेदवार उभा करण्याच्या मनस्थितीत
रत्नागिरी: कुणबी समाजाने वेळोवेळी अनेक पक्षाना पाठिंबा देवूनही त्यांचे प्रश्न न सुटल्याने येत्या विधानसभेत कुणबी समाज आपला स्वतंत्र उमेदवार उभा करण्याच्या मनस्थितीत असल्याचे कळते. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणबी समाजाची महत्वाची बैठक दापोली येथे आयोजित करण्यात आली असून या बैठकीत विविध राजकीय पक्षात असलेल्या कुणबी समाजातील लोकांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांना मते मांडण्याची संधी दिली जाणार आहे.
माजी मंत्री खासदार अनंत गीते यांचा या निवडणुकीत पराभव झाल्याने समाजामध्ये नाराजी पसरली असून आता विधानसभेसाठी आपल्या समाजाचा प्रतिनिधी देण्याचा विचार सध्या समाजात सुरू आहे.
www.konkantoday.com