
राष्ट्रवादीच्या नांगरणी स्पर्धेतील आयोजक व बैलगाडी चालकांविरुद्ध गुन्हा दाखल
राज्याचे माजी मंत्री व गुहागर भागाचे आमदार भास्कर जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील शृंगारतळी येथे नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा गुहागर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा मोठ्या उत्साहाने पार पडली. स्पर्धा बघण्यासाठी प्रेक्षकांनीही मोठी गर्दी केली होती.स्पर्धा झाल्यानंतर पोलिसांनी मुक्या प्राण्यांची पिळवणूक केल्या बद्दल स्पर्धेचे संयोजक व बैल गाडीचालक अशा ३४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करणाऱ्यांमध्ये आमदार जाधव यांच्या मुलाच्या नावाचाही समावेश केल्याने खळबळ उडाली आहे. वास्तविक ही स्पर्धा अनेक दिवस जाहीर करण्यात आली होती. देवरूख पाटगाव येथे आयोजित केलेल्या स्पर्धेत बैल उधळल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यानंतरही स्पर्धा जाहीर झाली होती. स्पर्धा घेऊ नये यासाठी पोलिसांनी काहीही सूचना केल्या नव्हत्या स्पर्धा पार पडल्यानंतर आयोजक व बैलाचे चालकांवर गुन्हे दाखल केल्याने या स्पर्धा घेण्यावर कायद्याने बंदी आहे का ? हे जाहीर करणे जरुरीचे आहे जर असे असेल तर जिल्ह्यात यापूर्वी अनेक स्पर्धा अशारीतीने पार पडल्या त्याबाबत पोलीस कोणती भूमिका घेणार आहे याकडे लक्ष लागले आहे.
www.konkantoday.com