
विकास आराखड्यात आवश्यक सुधारणा करणार, आ. किरण सामंत यांचे आश्वासन
जनतेचे नुकसान करण्याचा माझा कोणताही हेतू नाही, त्यामुळे जे होईल ते चांगलेच काम होईल. मी कायमस्वरुपी तुमच्यासोबत असून विकास आराखड्यात आवश्यक असलेल्या सर्व सुधारणा करून देण्याची जबाबदारी माझी आहे आणि ते मी करून देणार, असे आश्वासन आमदार किरण सामंत यांनी कुवे येथे ग्रामस्थांना दिले.
कुवे येथे नुकतीच विकासकामांची आढावा बैठक पार पडली. याप्रसंगी आमदार किरण सामंत बोलत होते. यावेळी आमदार सामंत यांच्यासह शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील कुरूप, तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, प्रसन्न शेट्ये, सचिन डोंगरकर, प्रसाद भाईशेट्ये, मनोहर बाईत, नंदराज कुरूप, मिलिंद लांजेकर, बापू लांजेकर आदींसह इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.www.konkantoday.com