कशेडी घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम पूर्णत्वाला
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अतिवृष्टीमुळे रस्ता खचण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे या भागात एकमार्गी वाहतूक सुरू होती.खासदार सुनील तटकरे यांनी कशेडी घाटाला भेट दीली व तेथील परिस्थितीची पाहणी केली. खचलेल्या भागाची दुरुस्ती करून हा रस्ता पूर्ववत वाहतुकीस चालू करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. आता हे दुरुस्तीचे काम पूर्णत्वाला गेले असून हा रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी खुला केला जात आहे. याबाबत खासदार तटकरे यांनी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांचेशी संपर्क करून येथील परिस्थितीची माहिती दिली होते.
www.konkantoday.com