“पेहचान कौन ? “दोन विद्यमान आमदार भाजपच्या संपर्कात
विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत चालल्या आहेत तसतसे भाजपमध्ये प्रवेशासाठी गर्दी उसळली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक विद्यमान आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक जण अजूनही इच्छुक आहेत. गेल्या काही दिवसात रत्नागिरी जिल्हय़ातही मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले व रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी दिलेले भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदार भाजप प्रवेशासाठी संपर्कात असल्याचे विधान केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मात्र हे आमदार नेमके कोण ही नावे त्यांनी गुलदस्त्यातच ठेवली आहेत. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यावर जिल्ह्यात राजकीय धमाका होण्याची शक्यता आहे. सध्या तरी हे आमदार कोण असणार “पेहचान कौन “असे म्हणत अनेक नावे जनतेत चर्चिली जात आहेत.
www.konkantoday.com
भास्कराव आणि संजयराव हेच
बघुया आता😉
त्यांना पदोपदी अनेकवेळा काही पक्षातील अंतर्गत कलहामुळे त्यांच्या बाबतीत नकळत त्यांचा कर्तुत्वाला दाबण्याचा प्रयत्न झाल्यानेच हा निर्णय शेठ घेतील आणि त्यांच्यामुळे संजयराव देखील