
रत्नागिरी जिल्ह्यातून कॉंग्रेस १०० टक्के मुक्त- आ. प्रसाद लाड
रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेमध्ये कॉंग्रेसच्या पाचल भागातील एकमेव सदस्या निशिगंधा भास्कर सुतार यांनी आज भाजपमध्ये आ. प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यांचेबरोबर त्यांचे पती राजापूर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष भास्कर सुतार यांनी देखील तालुका कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला याशिवाय मूरचे सरपंच संजय सुतार व राजापूर नाणार येथील सचिन उर्फ पप्पू देसाई यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. देसाई हे नाणार रिफायनरी प्रकल्प समर्थन करणारे जनसमितीचे कार्याध्यक्ष आहेत. राजापुरातील हॉटेल व्यावसायिक व रिक्षा सेनेचे अभिजित गुरव यांनी देखील आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.रत्नागिरीतील बांधकाम व्यावसायिक संजय आयरे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. मुरचे उपसरपंच केशव गुरव, मुरचे माजी सरपंच दिलीप कोळवणकर, कोलिवडेचे पुंडलिक नाफडे आदी ५० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सोहळा पार पडला. यावेळी भाजप कार्यालयात पार पडलेल्या प्रवेश सोहळ्याला आ. प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष दिपक पटवर्धन, ऍड. बाबा परूळेकर, निलमताई गोंधळी, चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, राजू मयेकर, सचिन वहाळकर, सतिश शेवडे, नगरसेवक उमेश कुलकर्णी, मुन्ना चवंडे, माजी प्राचार्य सुभाष देव,प्रशांत डिंगणकर,महेंद्रशेठ जैन, प्रवीण देसाई, आदी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आम्ही देश कॉंग्रेसमुक्त करण्याची घोषणा केली होती. आता त्याची सुरूवात आम्ही रत्नागिरी जिल्ह्यापासून केली असून कॉंग्रेसचा एकमेव असलेला जि.प. सदस्याने भाजपमध्ये प्रवेश केल्याने जिल्हा कॉंग्रेसमुक्त झाला असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रसाद लाड यांनी दिली. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे आम्ही स्वागत करू. त्यांना पक्षात मान, सन्मान मिळेल असे सांगून लाड म्हणाले की, जिल्ह्यात भाजपची ताकद वाढत असून आता कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रवेशामुळे राजापूरमध्ये भाजपची ताकद चांगली वाढली आहे.
www.konkantoday.com