
वेत्ये येथे आढळली कासवाची अंडी
राजापूर : वेत्ये येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची 126 अंडी शुक्रवारी सापडली आहेत. समुद्र किनारी पहाटेच्या दरम्यान फेरफटका मारताना कासवमित्र गोकुळ जाधव यांना ही अंडी आढळली असून त्यांनी वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली त्याचे योग्यपद्धतीने संवर्धन केले आहे. त्यातून, वेत्ये किनारपट्टीवर यावर्षीचे चौथे घरटे ठरले असून आजपर्यंत या ठिकाणी तब्बल 394 अंड्यांचे सुरक्षितपणे संवर्धन करण्यात आले आहे. याबाबत जाधव यांनी राजापूर वनविभागाचे वनपाल सदानंद घाटगे, सागर गोसावी आदींशी संपर्क साधून त्याबाबतची माहिती दिली. त्यानंतर अंड्यांचे सुरक्षित ठिकाणी संवर्धन करून ठेवण्यात आले आहे.