नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या युतीबाबत आपली आमदार सामंत यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा नाही: आ. प्रसाद लाड
रत्नागिरी : रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे आपले जवळचे चांगले मित्र आहेत. रत्नागिरीतील नगराध्यक्षपदाची निवडणूक लवकरच होणार आहे. मात्र आपली उदय सामंत यांच्याशी या निवडणुकीबाबत राजकीय अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे आ. प्रसाद लाड यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. भारतीय जनता पक्षाची लोकसभा व विधानसभेसाठी युती आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक ही युती म्हणूनच लढविण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल हे सांगता येत नाही. एकीकडे असे विधान करताना आ. प्रसाद लाड यांनी रत्नागिरी विधानसभेच्या जागेबाबत आ. उदय सामंत यांना निश्चिंत केले आहे. यामुळे रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत भाजप निवडणूक लढवण्याची मागणी करणार नाही हे स्पष्ट झाले आहे. सध्या विद्यमान आमदार ज्या ज्या ठिकाणी निवडून आले आहेत तो युतीतील कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला विधानसभेसाठी तिकिट देण्याचे धोरण आहे. शिवसेनेत असलेले उदय सामंत यांचे आमदार काळातील काम चांगले असल्याचे शिफारसपत्रही लाड यांनी दिले. यामुळे भाजप-सेना युतीचे उमेदवार म्हणून आ. उदय सामंत असणार हे आता निश्चित झाले आहे.
www.konkantoday.com