गावाच्या सीमेवर वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी लोखंडी कुंपण देण्याचा शासनाचा निर्णय
रत्नागिरी: अनेक गावात वन्य प्राण्यांचा वावर वाढत असून वाघ, बिबट्यांचे वारंवार हल्ले होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. याशिवाय काही वन्यप्राणी शेतीचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे अशा वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळावे यासाठी अशा संवेदनशील गावांच्या वन सीमेलगत लोखंडी जाळीचे कुंपण करण्याचा निर्णय शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून सुरूवातीला ज्या गावात वाघ किंवा बिबट्या यांचा जास्त वावर होत आहे त्या ठिकाणी निवडक गावांच्या सीमेवर प्रायोगिक तत्वावर कुंपण उभारण्यात येणार आहे.
www.konkantoday.com