
रत्नागिरी शहरात आता दुधापाठोपाठ आंब्यांचीही चोरी ,७५हजार रुपये किमतीच्या ५०आंब्याच्या पेट्यांची चोरी
रत्नागिरी शहरात मध्यंतरी पहाटे दुकानांच्या बाहेर ठेवलेल्या दुधाच्या पिशव्यांची चोरी झाली होती आता दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या ७५हजार रुपये किमतीच्या ५० आंब्याच्या पेट्यांची चोरी होण्याचा प्रकार रत्नागिरी शहरातील उद्यमनगर राेड वरील आनंद सागर अपार्टमेंटच्या तळमजल्यावर घडला याबाबत रत्नागिरी पोलीस स्थानकात साै.प्राजक्ता प्रवीण केणे यांनी चोरीची फिर्याद दाखल केली आहे.
यातील फिर्यादी केणे यांचा उद्यमनगर रोडवरील आय सी सी आय बँकेसमोर आनंद सागर अपार्टमेंट तळमजला येथे स्वतःच्या मालकीचा गाळा आहे या गाळ्यांसमोरील जिन्याच्या खाली बाहेरच्या बाजूला त्यानी १५तारखेला रात्री ६डझन आंबे असलेली एक पेटी अशा ५०पेट्या ठेवल्या होत्या त्याची किंमत ७५हजार रुपये एवढी होती अज्ञात चोरट्याने जिन्याखाली ठेवलेल्या या आंब्याच्या पेट्या चोरून नेल्या सकाळी हा चोरीचा प्रकार उघड झाला.
www.konkantoday.com