
समृद्ध कोकणच्यावतीने मुंबईत कोकणातील गुंतवणूक व भविष्यातील संधी या विषयावर परिषदेचे आयोजन
रत्नागिरी: समृद्ध कोकण संघटना, ऍडव्हान्टेज कोकण परिषद आणि कोकणभूमी प्रतिष्ठान यांच्यावतीने कोकणातील गुंतवणुकीच्या व व्यवसायाच्या भविष्यातील संधी या विषयावर २६ ऑगस्ट रोजी वीर सावरकर सभागृह, शिवाजीपार्क दादर प. मुंबई येथे परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, शिवाजीराव दौंड, कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष आदी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत कोकण आयडॉल परिषद सोहळाही पार पडणार आहे.
या परिषदेला कोकणप्रेमी नागरिकांनी व तरूणांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोकण भूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय यादवराव आणि कार्याध्यक्ष किशोरभाई धारिया यांनी केले आहे.
www.konkantoday.com