रत्नागिरीत रंगणार प्रथमच स्टँडअप कॉमेडीचा कल्ला

यंग ०८ या रत्नागिरीतल्या ग्रुपने प्रथमच रत्नागिरीत स्टॅंडअप कॉमेडी स्पर्धेचे आयोजन केले आहे.शो म्हणजे शो असे या हास्या स्पर्धेचे नाव असून या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातुन विविध स्पर्धक सहभागी होणार आहेत त्याला मोठा प्रतिसादही मिळत आहे.ही स्पर्धा १८ ऑगस्ट रोजी स्वा.वि.दा. सावरकर नाट्यगृह येथे सायं ६:३० ते १०:०० या वेळेत होणार अाहे.ह्या स्पर्धेसाठी प्रथम ₹ १०,०००/- , द्वितीय ₹ ७,०००/-, तृतिय ३,०००/-अशी रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत व प्रेक्षकांसाठी ₹१००/- प्रवेश मुल्य ठेवण्यात आले आहे.मोठ्या शहरांमध्ये होणाऱ्या अशा स्पर्धा आपल्या कोकणात होत असल्याने हास्यप्रेमी रसिकांसाठी ती एक पर्वणीच ठरणार आहे.
तसेच या स्पर्धेमध्ये सेलिब्रेटि जजेस, राज्यभरातील दर्जेदार स्पर्धकांचे सादरीकरण व रत्नागिरीत गाजलेल्या तात्या आणि शिवरामाचे धमाल निवेदन होणार आहे त्यामुळे हा कार्यक्रम रंगतदार होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.या स्पर्धेच्या तिकिटांची विक्री सावरकर नाट्यगृह येथे सुरू असून ऑनलाइन तिकिटासाठी itsmyshow.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.यंग ०८ या ग्रुपने या अगोदर रंग दे रत्नागिरी असा रंगपंचमीचा इव्हेंट ऑर्गनाईज केला होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button