
मत्स्य विभागाच्या पवित्र्यामुळे आश्रयासाठी आलेल्या परजिल्ह्यातील मच्छिमारी बोटींवरील माशांचे नुकसान
रत्नागिरी : शासनाने मच्छिमारी बोटींवरील बंदी उठविल्यामुळे समुद्रात मच्छिमारीसाठी आलेल्या रायगड, मुंबई येथील मच्छिमारी नौका वादळी वार्यामुळे जयगड बंदरात आश्रयासाठी थांबल्या होत्या. यावेळी त्यांच्या बोटीवर पकडलेली मासळी होती. या मच्छिमार नौकांना बर्फ, पाणी, अन्नधान्य व इतर बाबतीत सहकार्य करण्यात आले. मात्र त्यांनी पकडलेली मच्छी उतरविण्यास तेथील स्थानिक मच्छिमारांनी विरोध केला होता. यामुळे मत्स्य विभागानेही या बोटींना मच्छी उतरवू दिली नाही. ही मच्छी उतरविण्यास द्यावी यासाठी मुंबईतील मच्छिमार सोसायट्यांच्या अध्यक्षांनी जिल्हा प्रशासनाकडे प्रयत्न केले. मात्र त्याला यश आले नाही. यामुळे या बोटींवरील पकडलेल्या मासळीची नासाडी होवून या मच्छिमारांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com