
मुंबई-गोवा महामार्गाच्या अर्धवट कामांमुळे समस्यांचा डोंगर
मुंबई-गोवा महामार्गाच्या अर्धवट कामामुळे शहरातील बहाद्दूरशेखनाका ते पाग परिसरातील नागरिकांपुढे यावर्षीही समस्यांचा डोंगर उभा आहे. त्यामुळे तक्रारीच्या पत्रांचा नगर परिषदेत खच पडला असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी ही सर्व पत्र राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सुपूर्द केली जाणार आहेत. यासंदर्भात गुरूवारी नगर परिषदेत झालेल्या बैठकीत शहरातील गटारे, नाले यांची साफसफाई वेगाने करण्याची मागणी नागरिकांनी केली.सध्या सुरू असलेली महामार्गाची कामे अर्धवट पद्धतीने केली जात आहेत. गटारांच्या कामांना दजर्जा नाही. टाकलेल्या मोर्या शेतांमध्ये साोडण्यात आल्या आहेत. यामुळे पावसाचे पाणी जाण्यास योग्य दिशा नसल्याने ते नागरिकांची घरे, इमारतींमध्ये शिरत असून यामुळे नुकसान होत आहे. www.konkantoday.com