जिल्ह्यात रोडरोमिओंविरूद्ध पोलिसांची मोहीम
रत्नागिरी :रस्त्यावर फिरणार्या रोडरोमिओंकडून कॉलेज तरूणींना त्रास दिला जातो. त्यामुळे आता पोलिसांनी अशा रोडरोमिओंविरूद्ध मोहिम उघडली असून काही दिवसांपूर्वी दापोली येथे अशा प्रकारे मोहीम राबविण्यात आली होती त्यानंतर चिपळूण येथेही ही मोहीम राबविण्यात आली आहे. चिपळूण येथील कॉलेज परिसरात साध्या वेशातील पोलीस अशा रोडरोमिओंवर पाळत ठेवून त्यांना ताब्यात घेवून समज दिली आहे. शहरातील विविध भागात अशा रोडरोमिओ व सार्वजनिक ठिकाणी बसलेल्या प्रेमीयुगुलांना पोलिसी भाषेत समज देण्यात आली आहे.
www.kokantoday.com