गणपतीपुळे विकास आराखद्याची बैठक म्हाडा अध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

म्हाडा अध्यक्ष, शिवसेना उपनेते ना.उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती हाेती.गणपतीपुळे विकास आराखड्याची कामे अर्थ मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार आणि आमदार उदय सामंत यांना विश्वासात न घेता सुरू केल्यामुळे पं.स.सदस्य गजानन पाटील व प्रकाश साळवी आणि स्थानिक ग्रामस्थांनी बंद पाडली होती.मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीसयांना आमंत्रित करून मी स्वतः कामांचा शुभारंभ कार्यक्रम करणार आहे ना.उदय सामंत यांनी सांगितले.या बैठकी मध्ये आमदार उदय सामंत यांनी लोकहिताचे तसेच ग्रामस्थांना अभिप्रत असलेले निर्णय घ्या असे आदेश अधिकाऱ्यांना दिले.मुख्य प्रवेशद्वार हे ९ मीटर रुंदीचे करणे.
दर्शन रांग जिथे आहे तथेच ( ओम गार्डन) करण्याचे ग्रामस्थांच्या मागणी प्रमाणे ठरवण्यात आले.
मंदिर परिसरातील मिठाई तसेच अन्य व्यवसायिक दुकानदार यांना १७ ऐवजी ३६ गाळे बांधून देणे.
गणपतीपुळे येथे पर्यटकांना वाचवणारे जीवनरक्षक अनेक महिने वेतनापासून वंचित होते त्याचा प्रश्न ही ना.सामंत यांनी या बैठकी मध्ये मार्गी लावला.
हे सर्व महत्त्वाचे निर्णय आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधनाचे वातावरण दिसून आले.या महत्वाच्या बैठकीला गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सरपंच गैरहजर राहिल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.यावेळी तालुकाप्रमूख बंड्या साळवी,जि.प.महिला व बाल कल्याण सभापती सौ.साधना साळवी,उपतालुकाप्रमुख प्रकाश साळवी, पं.स.सदस्य गजानन पाटील,उत्तम मोरे,सौ.रश्मी सुर्वे,कल्पेश सुर्वे,बबन तांदळे, विनायक सावंत, परेश कुबडे, दिलीप केळकर,मयूर केदार,प्रमोद केळकर,अशोक काळोखे व ग्रामस्त मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button