कोकणातील पहिल्या फॉरेन्सिक लॅबचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी :कोकणातील पहिल्या फॉरेन्सिक लॅबचे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी खासदार विनायक राऊत, म्हाडाचे अध्यक्ष आ. उदय सामंत, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा महासंचालक हेमंत नगराळे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे, डॉ. कृष्णा कुलकर्णी, डॉ. संगीता घुमटकर व नगराध्यक्ष बंड्या साळवी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
किचकट गुन्हे प्रकरणात बहुमुल्य भूमिका बजावणारी ही फॉरेन्सिक लॅब रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हती. त्यामुळे या जिल्ह्यात घडलेले गुन्ह्याचे मुद्देमाल पुणे येथील प्रयोगशाळात पाठवावा लागत होता. अलिकडच्या काळात गुन्हेगारांकडून अत्याधुनिक सामुग्री व पद्धतीचा वापर करण्यात येतो. त्यामुळे या मुद्येमालांवर रासायनिक विश्लेषण करण्याच्या दृष्टीने व न्यायदानासाठी आवश्यक असणारा महत्वाचा वैज्ञानिक पुरावा देण्यामध्ये ही लॅब महत्वाची भूमिका बजावत असते. आता ही लॅब रत्नागिरी व सिंधुदुर्गासाठी सुरू झाल्याने तपास कामासाठी चांगली गती मिळणार आहे. ही लॅब पुष्पेंद्रसिटी खेडशी या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला शहरातील मान्यवर उपस्थित होते.
www.konkantoday.com