अंतर्गत बदल्या केल्यामुळे अधिकार्यांना नगरसेवकांनी धरले धारेवर, बदल्या केल्या रद्द
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेमध्ये अंतर्गत बदल्या केल्याने अधिकार्यांना ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये यांनी धारेवर धरले. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्यातील हा वाद समोर आला. संबंधित अधिकार्यांनी रत्नागिरी नगर परिषदेमध्ये काही कर्मचार्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या होत्या. या बदल्या केल्यामुळे नगरसेवकांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. नगर परिषद अंतर्गत बदल्या करण्याचे अधिकार तुम्हाला कुणी दिले. प्रशासकीय कामात तुम्ही हस्तक्षेप का करताय? असा सवालही अधिकार्यांना करण्यात आला. तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करा असाही इशारा नगरसेवकांच्यावतीने देण्यात आला. त्यामुळे या अधिकार्यांनी केलेल्या बदल्या परत रद्द करण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com