भगवती किल्ल्याजवळ मच्छीमारी नौका बुडाली१ खलाशी बेपत्ता पाच जणांना वाचवण्यात यश
खवळलेल्या समुद्रामुळे रत्नागिरीजवळील भगवती किल्ल्याजवळ एक मच्छीमार नौका बुडाली.या नौकेवर सहा खलाशी होते त्यापैकी एक खलाशी बेपत्ता असून उर्वरित पाच जण वाचले आहेत. ही नौका राजीवडा येथील फणसोपकर यांच्या मालकीची आहे. मच्छीमार नौका आज सकाळी या परिसरात मच्छीमाराची जाळी टाकून उभी होती त्यावेळी समुद्रातील लाटांमुळे ही मच्छीमारी नौका वाहू लागली त्यावेळी मच्छिमारी नौकेचे इंजिन चालू करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला त्यामुळे ही मच्छीमारी नौका बुडाली.या मच्छिमारी नौकेवरील रामचंद्र पवार हा खलाशी बेपत्ता आहे.तीन खलाशांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
www.konkantoday.com