वीज न भरल्याने गुहागरमधील कोतळूक गावात बीएसएनएल टॉवर बंद

गुहागर तालुक्यातील कोतळूक गावातील बीएसएनएलचा टॉवर लाईटचे बिल न भरल्याने बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत असल्याने ग्रामस्थांनी चिपळूण येथील मंडळ अभियंता कार्यालयावर धडक मारली. आठ दिवसांत सेवा कार्यान्वित न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सध्या बीएसएनएलची अवस्था बिकट असून गुहागर तालुक्यातील अनेक टॉवरची विजेचीबिले न भरल्याने वीजपुरवठा खंडित करणेत आला आहे. कोतुळुक गावातही टॉवर बंद पडल्यामुळे पोस्ट ऑफिस बँका सहकारी संस्था एटीएम आदी सुविधा ठप्प झाल्या आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button