
नांगरणी स्पर्धा प्रकरणी आयोजकांसह सातजणांवर गुन्हा दाखल
देवरूख पाटगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या शेत नांगरणी स्पर्धेत एक बैलजोडी उधळल्याने काही जण जखमी झाले होते. या प्रकरणाची दखल घेऊन पोलिसांनी आयोजकांसह बैलगाडीचे चालक व मालक अशा सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.जिल्ह्यात ठिकठिकाणी अशा स्पर्धा होतात.पाटगाव येथे झालेल्या स्पर्धेत बैलजोडी उधळली गेली आणि त्यांनी लोखंडी रेलिंग तोडून प्रेक्षकात प्रवेश केला. या घटनेत काही जण जखमी झाले होते. त्याची दखल घेऊन पोलिसांनी सुनील गोपाळ बाळा पंदारे, विजय नटे, दिलीप नटे, बाबू गोपाळ यांचे सह स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या भाजपचे पदाधिकारी अधटराव, गवंडी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सध्या बैलगाडी स्पर्धांवर न्यायालयाने बंदी घातल्यामुळे त्यातून मार्ग काढत नांगरणी स्पर्धा आयोजित केल्या जात होत्या.
www.konkantoday.com