
चिपळुणात भटक्या कुत्र्यांचा नागरिकांवर हल्ला
चिपळुणात अनेक भागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून या कुत्र्याने अनेक जणांना चावा घेण्याचे प्रकार घडले आहेत. गोवळकोट व पेठमाप परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने लहान मुलीसह काही नागरिकांना चावे घेऊन जखमी केले. यामुळे नागरिकांनी कुत्र्यांची दहशत घेतली आहे.नगर परिषदेने सहा महिन्यांपूर्वी कुत्र्यांच्या नसबंदीवर लाखो रुपये खर्च केले परंतु तरीदेखील कुत्र्यांची संख्या कमी झालेली नाही.
www.konkantoday.com