गणपतीपुळ्यात मुख्य रस्त्यावर सांडपाणी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
रत्नागिरी : श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे वर्दळीच्या रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्याने ग्रामस्थांच्यात व पर्यटकांच्यात नाराजी निर्माण झाली आहे. श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील मनुताई पार्क येथे चेंबर्समध्ये येणारे सांडपाणी चेंबर तुंबल्याने रस्त्यावरून वाहत असून त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या भागात असलेल्या हॉटेल्स व लॉजचे पाणी या चेंबर्समधून येत असते. मात्र हे चेंबरच तुंबल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
www.konkantoday.com