
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रशासकीय तसेच पोलीस यंत्रणा सज्ज
रत्नागिरी : १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तसेच कोकणातील किनारपट्टीवर पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. जम्मू काश्मिर येथील कलम ३७० रद्द केल्यानंतर काही दहशतवादी संघटना सक्रिय झाल्याचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कोकणातील किनारपट्टी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने पोलीस दलाकडून पावले उचलण्यात आली असून त्या भागात पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवर नागरिकांना काही संशयास्पद आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com