सिंधुदुर्गातील प्रवाशाचा मोबाईल लांबविला
सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेच्या दादर पॅसेंजरमधून प्रवास करणारे सुहास जांभळे रा. अरूळे, सिंधुदुर्ग यांचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना घडली आहे. यातील जांभळे हे दापोली कृषि विद्यापीठात शैक्षणिक कामासाठी गेले होते. तेथून ते परतीच्या प्रवासासाठी दादर पॅसेंजरमधून प्रवास करीत असताना त्यांना झोप लागली. त्याचा फायदा चोरट्याने घेवून त्यांच्याकडे असलेला मोबाईल लांबविला.
www.konkantoday.com